आपण सगळ्यांनीच आज एका अत्यंत निर्बुद्ध, सांस्कृतिकदृष्ट्या ‘आंधळ्या युगा’मध्ये प्रवेश केलेला आहे!
सी. पी. स्नो नावाचे एक इतिहासाचे ब्रिटिश अभ्यासक आहेत. त्यांनी असं म्हटलं होतं की, कला, साहित्य आणि भौतिक विज्ञान यांची जेव्हा फारकत होते, तेव्हा त्याचा परिणाम संस्कृतीवरही घडतो आणि इतिहासावरही घडतो. दुसरे महाराष्ट्रातले आद्य तत्त्वचिंतक अच्युतराव पटवर्धनांनी एका भाषणामध्ये असं म्हटलं होतं की, ‘जेव्हा दृश्य आणि द्रष्टा यांच्यामधलं अंतर अधिकाधिक वाढतं, तेव्हाच वास्तव अर्थानं तटस्थपणे घडामोडींकडे पाहिलं जातं.’ .......